Sunday, April 28, 2024
Homeगुन्हेगारीडोहात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू…!

डोहात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू…!

Share

रामटेक – राजु कापसे

अरोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसोली गावात एका 15 वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अरोली पोलीस ठाण्या हद्दीतील आसोली गावातील रहिवासी 15 वर्षीय अतुल उमेश सहारे हा आपल्या 2 मित्रांसह गावाजवळील डोहात पोहायला गेला असतांना अचानक अतुलला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलात जाऊन बुडू लागला.

बुडल्याची माहिती अरोली पोलिसांना मिळताच अरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले.पोलिसांनी तात्काळ मुलाला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचाराकरिता नेण्यात आले.मात्र उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला.शवविच्छेदन करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात असून अरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आले आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: