Saturday, June 1, 2024
Homeमनोरंजनलोककला जपून मंडईतून ते करतात प्रबोधन व मनोरंजन...

लोककला जपून मंडईतून ते करतात प्रबोधन व मनोरंजन…

रामटेक – राजु कापसे

दिवसेंदिवस लोककला लोप पावत चाललेल्या आहेत.शहरी भागात तर लोककलांचे पुनरुज्जीवन होणे ही कठीण झाले आहे.ग्रामीण भागात मोजकेच सांस्कृतिक कला मंडळ लोककलांची परंपरा जोपासत आहे.त्यातीलच एक म्हणजे न्यू जागृती शारदा व सांस्कृतिक कला मंडळ,हमलापुरी हे होय.

ग्रामीण भागात दिवाळी,पंचमी व वेगवेगळ्या उत्सवानिमित्त मंडईचा कार्यक्रम साजरा होत असतो या कार्यक्रमात शाहीर लोकं आपल्या मंडळाद्वारे दंडार,तमाशा सादर करीत असतात…दंडार,तमाशा सादर करणे याला मोठता प्रमाणात आर्थिक खर्च येतो.मंडईतून दंडार सादर करून दंडारीसाठी लागणारा खर्चही निघत नाही.

त्यामुळे अनेकांनी सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून दंडार व इतर कला सादर करणे जवळपास बंदच केले आहे. मात्र ‘लोकनाट्यकला टिकली पाहिजे व येणाऱ्या नवीन पिढीला दंडार म्हणजे काय हे कळले पाहिजे,लोकांचे प्रबोधन व मनोरंजन झाले पाहिजे’ या भावनेतून न्यू जागृती शारदा व सांस्कृतिक कला मंडळ,हमलापुरी(ता.रामटेक) या मंडळाचे शाहीर शोभेलाल ठकरले व जीवतू डहारे मंडईतून दंडार सादर करतात.

नुकत्याच झालेल्या नगरधनच्या मंडईत तर त्यांची एकमेव दंडार होती. परिसरातील गावातील मंडईतसुद्धा त्यांनी आपली दंडार ही लोकनाट्यकला यावर्षी सादर केली.त्यांच्या सोबतीला रामकिसन ठकरेले,श्रावण ठकरेले,फजीत बघेले,क्रिष्णा ठकरेले,छत्रू बंधाटे,राजहंस खडसे (ढोलक वादक),महादेव माहुले,महेश ठकरेले,भुमेश्वर बघेले,

तुळशीराम ठकरेले,दिनेश ठकरेले,सेवकराम ठकरले,रामनाथसिंग देसाई (ब्यान्जो मास्टर) या कलाकारांसह सुमीत ठकरेले,पंकज ठवरे,नमन ठकरेले,निशु ठकरेले,नैतिक ठकरेले,सुधांशु ठकरेले,भविष्य ठकरेले हे बालकलाकार आपली नृत्य व दंडार कला सादर करतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments