Homeराज्यश्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे कारसेवा करून, राममंदिर निर्माण होण्यासाठी योगदान देणाऱ्या कारसेवकांचा...

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे कारसेवा करून, राममंदिर निर्माण होण्यासाठी योगदान देणाऱ्या कारसेवकांचा भव्य स्वागत समारंभ…

Share

रामटेक – राजु कापसे

रामटेक:- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे कारसेवा करून, राममंदिर निर्माण होण्यासाठी योगदान देणाऱ्या रामटेक, मौदा व पारशिवनी येथील कारसेवकांचा भव्य सत्कार समारंभ दिनांक १० फेब्रुवारीला सुपर मार्केट रामटेक येथे मोठ्या थाटात साधू संतांचा शुभहस्ते व आमदार आशिषजी जयस्वाल, रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक), माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीचा, त्यागाचा, शौर्याचा इतिहास, संघर्षाची गाथा प्रवक्ते श्री. श्रीधरराव गाडगे मा.प्रांत सहसंचालक, रा.स्व. संघ विदर्भ, यांनी सांगितली. प्रभू श्रीरामचंद्राचा सुमधुर संगीताने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी सुश्री साध्वी वंदनाजी महाराज, श्री. सिध्द नारायण टेकडी, अंबाळा, परम पुजनिय महानत्यागी महंत श्री. छोटे बालकदासजी महाराज, सुर-संगम सिद्ध आश्रम धर्मापुरी, महंत श्री कैलाशपुरी महाराज, नागार्जुन रामटेक, स्वामी शिवप्रेमानंद महाराज रामकृष्ण नवजीवन आश्रम अंबाळा, महंत श्री विष्णूगिरी महाराज दादाजी धुनीवाले आश्रम अंबाळा, श्री मोहनराव महाराज पंडे मुख्य पुजारी श्रीराम मंदिर रामटेक, श्री. श्रीधरराव गाडगे मा.प्रांत सहसंचालक, रा.स्व. संघ विदर्भ, श्री. विजयजी हटवार,

श्री. संजय बिसमोगरे, डॉ. राजेश ठाकरे, श्री. संजय मुलमूले, श्री. राहुल किरपान, श्री. आलोक मानकर, श्री. पप्पू यादव, श्री. विवेक तोतडे, श्री. मोहन कोठेकर, कारसेवक श्री. मंगलप्रसाद घुगे सर, श्री. ओम डडोरे, श्री. देवा अवथरे, श्री. अभय ठाणेकर, श्री. नानाजी नानोटे, श्री. नाना उराडे, सर्व कारसेवक, रामभक्त, कारसेवक सत्कार समितीचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: