Sunday, June 2, 2024
Homeराज्य२१ जानेवारी रोजी प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा समारोह च्या पूर्वसंध्येला गडमंदिर रामटेक...

२१ जानेवारी रोजी प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा समारोह च्या पूर्वसंध्येला गडमंदिर रामटेक येथे भव्य दीपोत्सव व पंचमहाआरती…

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा क्षेत्रातील सर्व रामभक्ताना विनंती करण्यात येत आहे की, प्राण प्रतिष्ठा समारोह पौष शुक्ल द्वादशी,विकर्मी सवंत २०८० सोमवार दिनांक २२जानेवारी २०२४वेळ दुपारी १२.२०वाजता निमित्त दिनांक २१ जानेवारी, पौष शुक्ल पक्ष एकादशी रोज रविवार ला गायत्री परिवार रामटेक व रामभक्त परिवार रामटेक विधानसभा तर्फे गडमंदिर परिसर रामटेक येथे सायंकाळी ठीक ०५.३० मिनिटांनी ११११ दिवे प्रकाशित करून पंचमहाआरती करण्यात येईल.

या भव्य दीपोत्सव कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री,नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री रामभक्त देवेंद्र फडणवीस,रामभक्त सुधाकर कोहळे,रामभक्त डी मल्लिकर्जून रेड्डी , योगेश वाडीभस्मे, राहुल किरपान, संजय(बंटी)गुप्ता, सौ.ज्योतीताई कोल्हेपरा यांचा उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला गायत्री परिवार रामटेक,रामभक्त महिला आघाडी,रामभक्त परिवारातील सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपोत्सव व महाआरती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments