Thursday, February 22, 2024
Homeराज्यप्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्याने गोंदियात २२ जानेवारीला खासदार प्रफुलभाई पटेल...

प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्याने गोंदियात २२ जानेवारीला खासदार प्रफुलभाई पटेल मित्र परिवार द्वारा विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

२२ जानेवारीला पावन नगरी अयोध्या मध्ये प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्याने गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा निमित्याने आयोजित भक्तिमय संगीत, महाआरती, विविध कार्यक्रमामध्ये माजी आमदार राजेंद्रजी जैन यांचे प्रमुख उपस्थितित खासदार प्रफुलभाई पटेल मित्र परिवार व्दारा राजीव गांधी चौक, शासकीय विश्रामगृह जवळ सकाळी ११.०० प्राणप्रतिष्ठा लाइव (LED) कार्यक्रम, दुपारी ०३.०० वाजता श्रीरामचंद्र दमाहे व् संच व्दारा रामभक्त संगीतमय कार्यक्रम, सायं ०५.०० वाजता संगीतमय श्रीरामचंद्र दरबार दर्शन, सायं ०६.०० वाजता रामयात्रा, सायं ०७.०० वाजता भव्य आतिशबाजी, रात ०८-०० प्रभू श्रीराम महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार प्रफुलभाई पटेल मित्र परिवार आयोजकांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: