Friday, June 14, 2024
spot_img
Homeराज्यनिरोगी महाराष्ट्र, प्रगतशील राष्ट्र हे सरकारचे ध्येय - आ.अँड. आकाश फुंडकर...

निरोगी महाराष्ट्र, प्रगतशील राष्ट्र हे सरकारचे ध्येय – आ.अँड. आकाश फुंडकर…

प्रभाग १३ व १५ मध्ये प्रधानमंत्री आयुषमान भारत योजना कार्ड नोंदणी शिबिर संपन्न…

खामगाव – हेमंत जाधव

निरोगी महाराष्ट्र, प्रगतिशील राष्ट्र हे केंद्र व राज्य सरकारचे ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार अँड. आकाशदादा फुंडकर यांनी केले. भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा व विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांचे संयोजनातून आणि आ .अँड. आकाशदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.13 व 15 मधील नागरिकांसाठी भाजपाच्या वतीने आज 25 ऑक्टोंबर रोजी सतिफैल भागातील छत्रपती शिवाजी महाराज न. प. शाळा क्रमांक 2 येथे मोफत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले,

यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेतकरी ,शेतमजूर, गोरगरीब, समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरू केली तसेच महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा योजना सुरू करण्यात आली.

या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शस्त्रक्रिया व दुर्धर आजारासाठी पाच लाख रुपयांचा विमा कवच सरकारने दिला आहे प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची हमी केंद्र व राज्य सरकारने घेतली आहे. राज्यातील, देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहिले तरच नागरिकांच्या स्वतःची, त्यांच्या परिवाराची व देशाची प्रगती होते याच भावनेतून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना अंमलात आणली आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आमदार अँड. आकाशदादा फुंडकर यांनी केले.

यावेळी आमदार आकाशदादा फुंडकर यांचेसह भाजपचे ज्येष्ठ नेते साहित्यिक रामदादा मोहिते,वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे ,तालुका वैद्यकीय अधिकारी अभिलाष खंडारे, माजी नगरसेवक हिरालाल बोर्डे,प्रवीण कदम, सौ. लताताई गरड, सतीशअप्पा दुडे या शिबिराचे संयोजक तथा भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड , डी. आर. गलांडे, सुरेश घाडगे,जितेंद्र पुरोहित,दिलीप गुप्ता, कृष्णा ठाकूर,शिवाजी आनंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिराचे यशस्वीतेसाठी डॉ सामान्य रुग्णालयातील प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे निरीक्षक डॉ. सागर देशमुख, डॉ अमोल भराटे, आरोग्य मित्र कमलेश इंगळे, आनंद मोरे, पंकज लीखार, सियससी केंद्राचे अमित देशपांडे, विशाल शेटे, कुणाला गलांडे गजानन मुळीक, शैलेश शोले ,गणेश कोमुकर, आशिष सुरेखा ,प्रतीक मिश्रा, अतुल सावेकर,

वैभव वाशीमकर, शुभम शिंदे ,अभिषेक तिवारी, हर्ष मिश्रा ,सर्वेश मिश्रा, गणेश पिंपळकर ,कोमल चव्हाण ,सतीश बोर्डे,आदर्श आनंदे, अनिकेत बोराखडे ,विशाल रेठेकर ,मयूर भवर ,सुनील श्रीनिवासन ,हिमांशू सावदेकर , अनंता अडांकर आदी प्रभाग 13 व 15 मधील भाजयुमो व विदयार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिराचे सुमारे हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: