Monday, June 17, 2024
spot_img
Homeराज्यसंत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसी च्यायोजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन...

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसी च्यायोजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ.डी.सी यांच्या योजनांचे भौतीक उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.

या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात 16 जून 2023 पर्यंत अर्ज कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील.

मुदती कर्ज योजना 30, महिला समृध्दी 40 योजना, लघुऋण वित्त योजना 18 व शैक्षणिक कर्ज योजना 10 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या सर्व योजना एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविल्या जातात. चांभार समाजा अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा चालू वर्षाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे/ मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक जीएसटीचे कोटेशन,

व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, मुदती कर्ज योजनेसाठी प्रकल्प अहवाल, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.

लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचा सिबील क्रेडिट स्कोअर 500 च्यावर असावा रिपोर्ट, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: