Sunday, June 2, 2024
Homeराज्यनरखेड नगर पालिका मुख्याधिकारी गायब..!

नरखेड नगर पालिका मुख्याधिकारी गायब..!

नरखेड शहरातील नागरिक नगर परिषद नरखेड येथे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना विविध समस्या विषयी निवेदन व चर्चा करण्याकरिता गेले असता मुख्याधिकारी कार्यालयात हजर नव्हते तरी प्रशासकीय अधिकारी कुरेकर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.नरखेड शहरातील सर्व जनता नरखेड मुख्याधिकारी व प्रशासनावर तीव्र नाराज आहे कारण नरखेड मध्ये पिण्याचे पाण्याची समस्या,नळाला गढुळ पानी येणे,नाली सफाई,मछराचा हैदोस असो,घरकुल पैसे असो कुठल्याही बाबतीमध्ये प्रशासन या ठिकाणी काम करताना दिसत नाही आहे.

मछराच्या हैदोसामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आजाराची संख्या वाढली आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहे अशा वेळेस या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नरखेड मध्ये घरकुल योजनेमध्ये शासनाकडून केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडून पैसे आल्यावर 31 मार्च पर्यंत खर्च करणे अपेक्षित होते परंतु हे बेफान शासक मुख्याधिकारी जागेवर राहत नाही आणि कर्मचारी सुद्धा त्यामुळे जागेवर राहत नाही त्यामुळे या नरखेड नगरीतील जवळपास चार करोड रुपये शासनाने परत नेले आणि आज घरकुल लाभार्थी आर्थिक लाभापासून वंचित राहिला आहे.

मुख्याधिकारी क्रित्येक महिन्यापासून कार्यालयात हजर राहत नाही.नरखेड येथील निवासस्थानी रोज दारू पिऊन घरी आजारी असल्याचा बहाना करून राहतो अशी ओरड व चर्चा गावात रंगली आहे.यांना काहीही समजत नाही यांचे पासून कर्मचारी संतापले आहे. अशा निर्लज मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणाहून तातडीने हाकलणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही निश्चितच शासन यांच्या बदलीची मागणी भारतीय जनता पार्टी नरखेड च्या वतीने करण्यात आली.

याप्रसंगी मनोज कोरडे, संजय कामडे,मनिष दुर्गे, अशोक कलम्बे,किशोरी कहाते,गुणवंत गिरडकर,दीपक महाजन,अनिल अलोने,पुरुषोत्तम वैद्य,प्रकाश सनेसर,रमेश क्षीरसागर,उमेश कलम्बे,खुशाल रेवतकर,रवि वेरुळकर,दीपक बेहरे,चंद्रशेखर कहाते,कैलास रेवतकर,स्वप्निल कामडे,विठ्ठल बालपांडे,प्रशांत बालपांडे,पुरुषोत्तम कडमधाड,प्रमिला वानोडे,आशा वानखेडे, नीलिमा सरोदे,अर्चना सोनोने आदि उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments