Homeराज्यसावित्रीबाई फुले विद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात...

सावित्रीबाई फुले विद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

Share

विद्यार्थ्यांसह माता पालकांचाही सहभाग

पातूर – निशांत गवई

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालक सावित्रीबाई फुले प्राथ. माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष कोवळ्या मनाचा या सदराखाली आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी करण्यात आले होते. सपनाताई म्हैसणे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांची उपस्थिती लाभली होती.

तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हादराव नीलखण, उमेश देशमुख, पांडुरंग अरबाड, मोहन जोशी, विलास मेतकर, प्रशांत म्हैसणे, निरंजन बोंबटकार, मधुकर उगले हे उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या उदात्त हेतूने दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेत दहावी व बारावी मधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा विद्यालयाची आहे त्या अनुषंगाने 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी गोपाल संतोष तळोकार याला ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळाला व सकाळी 7:45 वाजता गोपाल तळोकार याच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर 8:00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून पालकांचे व उपस्थितांचे मने जिंकली विशेष म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्या मध्ये त्यांच्या मातांनी सुद्धा सहभाग घेतला होता.पालकांनी व उपस्थितांनी बक्षीस रुपी आशीर्वाद देऊन सदर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले या कार्यक्रमाला सचिन ढोणे मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले प्राथ.

शाळा पातुर, जयद्रथ कंकाळ प्राचार्य सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर तसेच शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य महिला व पुरुष यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थीनी तनुश्री राखोंडे, श्रुती राऊत, श्वेता तायडे,संचिता भगत, विद्यार्थी ओम कढोणे, मयूर साबळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उद्धव काळपांडे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: