Monday, May 6, 2024
Homeराजकीयमुदखेड येथील अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...

मुदखेड येथील अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात मुगट-इंजळी रस्त्यावर रिक्षा व ट्रकच्या भीषण अपघतात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय मुदखेड व विष्णुपूरी येथील शंकरराव चव्हाण आरोग्य संकुल नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: