Sunday, April 28, 2024
Homeराज्य४ फेब्रुवारीला दक्षिण दिग्विजय मोहीम - श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक नितीन...

४ फेब्रुवारीला दक्षिण दिग्विजय मोहीम – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक नितीन चौगुले…

Share

सांगली – ज्योती मोरे

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या भाग्यलक्ष्मी मंदिर ते गोवळकोंडा या दक्षिण दिग्विजय मोहिमेत हजारो नागरिकांनी सहभागी व्हावं. असं अवाहन संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य देशातील अनेक राज्यात विस्तारलं होतं.त्यातीलच एक म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहिम.या मोहिमेत महाराजांनी गोवळकोंडा किल्ला रक्त न सांडता तहाव्दारे जिंकला.या या किल्ल्यावर यावर्षी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने एक दिवसीय मोहीम आयोजित करण्यात आलीय.

भाग्यलक्षी मंदिर ते गोवळकोंडा भाग्यनगर,हैद्राबाद अशी ही मोहिम असून,4 फेब्रुवारी रोजी यासाठी महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.सदर मोहिमेत हजारो शिवभक्तांनी सहभागी व्हावं असं अवाहन आज संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: