Friday, September 22, 2023
Homeग्रामीणमाहे डिसेंबर २२ पूर्वी कार्यकाळ समाप्त होणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व कामांस प्रारंभ…

माहे डिसेंबर २२ पूर्वी कार्यकाळ समाप्त होणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व कामांस प्रारंभ…

संजय आठवले, आकोट

येत्या माहे डिसेंबर २०२२ पूर्वी आपला पाच वर्षिय कार्यकाळ पूर्ण करणा-या तालूक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व कामास निवडणूक विभागाने प्रारंभ केला असून ह्या निवडणूका येत्या नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

आकोट तालूक्यातील अमोना, बेलूरा, धारेल, धारगड, धारूर रामापूर, गुल्लरघाट, कालवाडी, करतवाडी आकोट, करतवाडी रेल्वे, लोहारी खू, महागाव, पोपटखेड, रोहणखेड, शहापुर रुपागड, कासोद शिवपुर, सोमठाणा, टाकळी खु, वस्तापूर मानकरी, वणी, वारुळा, बळेगाव, बांबर्डा, देऊळगाव, धामणगाव, दिवठाणा, जळगाव नहाटे, जितापुर प्र. अडगाव, लांबकानी, लोतखेड, मरोड़ा, नखेगाव, नेव्होरी बू.,पाटसूल, रेल, टाकळी बु.,तरोडा, वडगाव मेन्ढे, पुंडा, रौंदळा, सावरगाव, वडाळी सटवाई, अकोली जहाँगीर, अकोलखेड, मुंडगाव ह्या ४४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या दोन तिन महिन्यात संपणार आहे.

त्यादृष्टीने आकोट तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाने निवडणूकपूर्व कामांना सुरुवात केलेली आहे. मतदार नोंदणी, मतदार याद्या, मतदान केंद्रे, निवडणूक ओळखपत्रे, वार्ड रचना आदी कामे निवडणूक अनुषंगाने पूर्ण व्हायची आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी तिनदा ही कामे पूर्ण करण्याबाबत या कार्यालयास आदेशित करण्यात आले होते. मात्र काही ना काही कारणाने तिनदा ही प्रक्रिया थांबविली गेली होती. आता ही प्रक्रीया चौथ्यांदा होत आहे. महत्वाचे म्हणजे आघाडी सरकारने ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवड ठेवली होती.

परंतु आता आघाडी सरकार जावून युती सरकार आले आहे. ह्या सरकारने सरपंच निवड थेट जनतेतून घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामूळे ह्या निवडणूकीकरिता या गावांतील लोकाना सरपंच पदाकरिता सक्षम अशा दमदार ऊमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. ह्या निवडणूका येत्या माहे नोव्हेंबर घेतल्या जाणार आहेत. म्हणजे ह्या गावांतील लोकाना निवडणूक तयारीसाठी तिन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: