Homeराज्यविहिंप बजरंग दल खामगाव कडून छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित...

विहिंप बजरंग दल खामगाव कडून छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य ज्ञान स्पर्धेत ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग…

Share

खामगाव – विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे दरवर्षी श्री शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी श्री शिवचरित्रावर आधारित ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दि.१९ फेब्रुवारी २०२३ रविवार ला ही ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.

खामगाव परिसरातील सर्व शाळांचा ३००० विद्यार्थ्यांनी या प्रश्नोत्तरे स्पर्धेत भाग घेतला वर्ग ५ते९ व वर्ग १०व११ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येते यामध्ये श्री शिवचरित्र, इतिहास, स्वातंत्र्य चळवळ क्रांतिकारक, संतांचे कार्य यावर प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी महाराजांचा कार्याचा अभ्यास करावा महाराजांनी केलेल्या कार्यातून काही गुण आत्मसात करावे या साठीच या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी विहिंप बजरंग दल कडून करण्यात येते.

रविवार दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर तसेच ग्रामीण भागातील टेम्बुर्णा ,घाटपूरी,पिंपळगाव राजा,पहुरजिरा,अंत्रज या 5 परीक्षा केंद्रावर सदर स्पर्धा घेण्यात आली सर्वप्रथम उपस्थित प्रमुख अतिथी राणा लकी सानंदा शाळेचे प्राचार्य श्री अरविंद स्वामी सर तसेच डॉ.पांडुरंग हटकर यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारत माता पूजन करून परीक्षेला सुरवात करण्यात आली.

यावेळी बजरंग दल प्रांत संयोजक ऍड अमोल अंधारे,विहिंप जिल्हाध्यक्ष राजेश झापर्डे,जिल्हा मंत्री राजेंद्रसिंह राजपूत,नगराध्यक्ष राजेश मुळीक उपाध्यक्ष श्याम माळवंदे, ऍड तरुण मोहता, नगरमंत्री सचिन चांदूरकर,बजरंग दल नगर संयोजक पवन माळवंदे स्पर्धा परीक्षा समिती संयोजक श्री जाधव सर,श्री मैदनकर सर, श्री बापुसाहेब करंदीकर तसेच मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांचा पालकांची उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विहिंप बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, परीक्षेत पहिल्या ३क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत बक्षीस वितरण सोहळा चैत्र शु प्रतिपदा दि २२ मार्च २०२३, हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला श्रीराम अयोध्या धाम ,टॉवर चौक येथे होईल.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: