Friday, May 10, 2024
Homeराज्यनांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू : १२ नवजात बालकांचा...

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू : १२ नवजात बालकांचा समावेश…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे.

शासकीय रुग्णालयात औषधीचा तुडवडा असून औषध पुरवठा करणाऱ्या हाफकीन संस्थेकडून वेळेवर औषधी पुरवठा होत नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 12 नवजात बालकांचा ही या मृतामध्ये समावेश आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान आरोग्यमंत्री उद्या रुग्णालयात भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: