Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्य१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.श्रीपालसबनीस तर स्वागताध्यपदी सुहास...

१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.श्रीपालसबनीस तर स्वागताध्यपदी सुहास पाटील जामगावकर…

सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयेजित २४ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर येथे होणार्या १९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ.श्रीपाल सबनीस तर स्वागताध्यपदी सुहास पाटील जामगावकर यांची निवड झाल्याची माहिती साहित्य परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली,

यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक,जिल्हाध्यक्ष प्रा,पंडितराव लोहोकरे, शहराध्यक्ष रमेश खाडे आदीजण उपस्थित होते, सबनीस यांनी एकूण ४५ हून अधिक ग्रंथाचे विपूल लेखन केले असून त्यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, ग्रामीण, प्रबोधनात्मक, चिंतनात्मक, धर्मशास्त्र, जीवनशास्त्र, आदी विषयांचा समावेश आहे,

पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सह त्यांनी आजवर ४० हून अधिक विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषिवले आहे , त्यांच्या अमोघ वाणीतून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच त्याबरोबर वास्तवाचे नवे आत्मभान हि दिले,

राज्य शासनाच्या पुरस्करांसह आजवर शेकडो पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, ग्रंथपूजनाने या साहित्य संमेलनाची सुरूवात होणार असून त्यानंतर उद्घघाटन समारंभ,परिसंवाद,कविसंमेलन, चर्चासत्र, व संमेलनाचा समारोप असे स्वरूप असणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: