Sunday, May 5, 2024
Homeराज्यरामटेक | हुतात्मा दिवसावर किट्स मध्ये १६५ विद्यार्थ्याचे रक्तदान...

रामटेक | हुतात्मा दिवसावर किट्स मध्ये १६५ विद्यार्थ्याचे रक्तदान…

Share

रामटेक – राजु कापसे

स्थानिय कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक येथे 30 जानेवारीला हुतात्मा दिवसावर प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी असे एकूण 165 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून सकाळी 11 वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून आदरांजली देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टणकर, कुलसचिव प्रा. पराग पोकळे ,रेनबो रक्तपीढीचे डॉ. रवि भांगे, लाईफलाईन रक्त पीढीचे संचालक डॉ. हरिष वर्भे व डॉ. प्रविण साठवने, जीएसके ब्लड सेंटरचे संचालक डॉ. आशिष खंडेलवाल सहित मोठ्या संखेत विद्यार्थी उपस्थित होते.

रक्तदान शिविर यशस्वीतेकरीता अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टणकर, एनएसएसचे डॉ. उद्धल हटवार, एनसीसीचे प्रा. रजत यादव, शारिरीक शिक्षण विभागाचे दिनेश जोशी यांच्या मार्गदर्शनात एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. विशेष बाब म्हणजे गेल्या 26 वर्ष्या पासून नियमित हुतात्मा दिवसावर किट्स मध्ये रक्तदान होत आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: