राहुल मेस्त्री
कोगनोळी तालुका निपाणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जिल्हा पंचायतीचे सदस्य जयवंत कांबळे यांच्या फंडातून सुमारे दोन लाख रुपयांचा निधी मंजूर करून गटारी काम चालू केले होते.
मात्र एका माध्यमाने याबाबत गटार कामांमध्ये कॉन्ट्रॅक्टर घाट घालत असून चांगल्या गटारी पाडून त्याच ठिकाणी नवीन गटार बांधत आहे आणि येथील ग्रामस्थांचा याला विरोध आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषद सदस्य जयवंत कांबळे यांना विश्वासात न घेता हे काम चालू आहे.असे वृत्तांकन केले होते.
पण या वृत्तांकनामुळे येथील ग्रामस्थ व तरुण वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. या गटार कामांमध्ये कोणीही विरोधाच्या प्रतिक्रिया दिल्या नाही पण वृत्तांकन कसे काय झाले यासाठी व सदर काम योग्य पद्धतीने सुरू आहे असे येथील ग्रामस्थ व तरुण वर्गाचे मत आहे.
ही बाब जिल्हा पंचायत सदस्यांना समजल्यावर त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन गटार कामाची पाहणी केली. व असे कुठेही झालेले नाही की मला विश्वासात न घेता हे काम चालू आहे अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोसले यांनीदेखील या कामाला कोणाचाही अडथळा नाही असे सांगितले.
यावेळी कॉन्ट्रॅक्टर मलगोंडा वडर ,बाबासाहेब आवटे ,अमर आवटे ,साताप्पा आवटे ,पुंडलिक शिंत्रे ,गिरीधर ढोबळे, आप्पासाहेब ढोबळे, सुमित मधाळे, नागेश मधाळे ,हर्षद ढोबळे ,नितीन घाटके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.