जि.प.सदस्य दिनेश बंग यांनी केला पत्रकारांचा सत्कार….

शरद नागदेवे

(या सत्कार समारंभ कार्यक्रमाने बंग परिवाराच्या वतीने गेले अनेक वर्षा पासुन उल्लेखनीय समाज कार्य करणार्‍यांचा सत्कार व कौतुक करण्याची परंपरा दिनेश बंग यांनी कायम ठेवली असल्याचे मान्यवरांनी वक्तव्य केले.)

हिंगणा : – दिवाळीचे औचित्य साधून, कोरोना काळात स्वत:सह परिवाराच्या जिवाची चिंता न करता पत्रकारांनी वृतसंकलन करून जनतेला न्याय मिळवून देण्यासह कोरोना प्रादुर्भावच्या दैनंदिन स्थिती बाबतची माहिती प्रकाशित करून जनतेला जागरूत केल्याचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल जि. प. सदस्य दिनेश बंग यांच्या वतीने व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते हिंगणा तालुक्यातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

या वेळी हिंगणा पं.स. सभापती बबनराव अव्हाले, जि.प. सदस्य दिनेश बंग, राकाँपा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, राकाँपा जिल्हा संघटक सुशील दिक्षित,राकाँपा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर,राकाँपा नेते महेश बंग पंचायत समिती सदस्यां अनुसयाताई सोनवणे,प्रमोद फुलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सत्कारमूर्ती मद्ये सुभाष वराडे, रमेश पाटील,मधुकर राजदकर, रवींद्र कुंभारे,गणेश धानोरकर, मनोज झाडे, नरेंद्र कुकडे, राजेंद्र सांभारे, अजय धर्मपूरिवार,संजय खडतकर,सोपान बेताल, पियुष पोकळे, लीलाधर दाभे, अनिल इंगळे,विनायक इंगळे,सतीश भालेराव,अलीम महाजन, गजानन ढाकुलकर,देवेंद्र शिरसाट, आशिष गोंडाणे,जितू वाटकर,चंदू कावळे, संदीप बालवीर,मधुसूदन चरपे, जानकीराम वानखेडे,रोशन कापसे आदीं पत्रकारांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here