झ्लेडचा मॅनस्केपिंगच्या क्षेत्रात प्रवेश, संवेदनशील जागांसाठी बॅलिस्टिक मॅनस्केपिंग ट्रिमर्स आणणार…

अत्यंत आधुनिक रूप आणि स्मार्ट रचना यांनी प्रेरित भारतातील पुरूषांच्या काळजीचा सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड झ्लेड आपल्या झ्लेड बॅलिस्टिकअंतर्गत पुरूषांसाठी नाजूक आणि संवेदनशील जागांमध्ये आपला अद्ययावत मॅनस्केपिंग ट्रिमर घेऊन आला आहे. या नवीन उत्पादनाचे अनावरण एप्रिल २०२१ मध्ये झाले आणि त्यामुळे ब्रँडच्या एकूणच विकासाचा नवीन पाया रचला गेला आहे.

झ्लेड बॅलिस्टिक हा भारतात आपल्या बॅलिस्टिक मॅनस्केपिंग ट्रिमर्स आणून मॅनस्केपिंगची संकल्पना आणणारा पहिला ब्रँड आहे. हा या वर्गातील पहिला ब्रँड असून तो भारतातील एकमेव खरा मॅनस्केपिंग ट्रिमर आहे, ज्याची रचना नाजूक आणि संवेदनशील जागांसाठी केली गेली आहे. या ट्रिमरमध्ये सिरॅमिक ब्लेड्स आहेत आणि त्यांच्या सेफएज तंत्रज्ञानामुळे कुठेही न कापता किंवा खरचटता एक उत्तम ट्रिम मिळू शकते. हे साधन १०० टक्के वॉटरप्रूफ आहे. त्यात सेफएज तंत्रज्ञान, वेगवान चार्जिंगसह लि-आयन बॅटरी आणि सुमारे ९० मिनिटे रनटाइम आहे.

झ्लेडचे प्रवक्ते म्हणाले की, “मॅनस्केपिंग हा शब्द पुरूष (मॅन) आणि लँडस्केपिंग या दोन शब्दांमधून आला आहे. त्याचा अर्थ ट्रिमिंग, वॅक्सिंग, शेव्हिंग आणि प्लकिंग या पद्धतींद्वारे सौंदर्य तसेच स्वच्छतेसाठी पुरूषाच्या शरीरावरील केस काढून टाकणे किंवा ते बारीक करणे होय. मॅनस्केपिंग शरीराच्या सर्व प्रकारच्या केसांसाठी लागू होते. जसे आयब्रो, कान, हात, काखा, छाती आणि पाठ तसेच खासगी जागा आणि पाय. आधुनिक पुरूष हा शरीराची काळजी, त्वचेची काळजी आणि त्याच्या एकूणच दिसण्याबाबत अधिक काळजी घेतो. झ्लेड मॅनस्केपिंग बॅलिस्टिक ट्रिमरला वेगळे ठरवणारे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हेड बदलता येते. आम्ही शरीराच्या अत्यंत संवेदनशील भागांवर काम करत असल्याने वारंवारतेनुसार त्याचा हेड दर ३-६ महिन्यांनी बदलणे योग्य ठरते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here