पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांचा DJ वर ‘झिंगाट’ डान्स…व्हिडीओ व्हायरल…

अमरावती – प्रज्योत पहाडे

अमरावती जिल्ह्यात बाप्पाला निरोप देताना सार्वजनिक गणेश मंडळांना अतिशय साध्या पद्धतीने निरोप देण्याचे आदेश होते. कोणत्याही मंडळाला DJ लावण्याची परवानगी नव्हती पण ज्यांनी परवानगी नाकारली तेच पोलीस वाले मस्त DJ वाजवत झिंगाट होऊन पोलीस स्टेशनच्या आवारात पाहायला मिळाले. हा प्रकार घडला आहे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्ये.

गावात 7 गणेश मंडळांना पोलिसांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीची परवानगी नाकारली, DJ वाजवणं तर दूरच. साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप देण्याचं पोलिसांनी गणेश भक्तांना सांगितलं पण आज पोलीस स्टेशनच्या बाप्पाला निरोप द्यायचा तेव्हा पोलीस स्टेशनमधील सगळे कर्मचारी यांनी काल दुपारपासूनच पोलीस स्टेशनच्या आवारात DJ लावून मस्त झिंगाट डान्स केले.

सायंकाळी 7.30 पर्यंत हे पोलीस स्टेशनच्या आवारात हे सुरु होते. गणेश भक्तांनी हा सगळा प्रकार मोबाईल मध्ये कैद केला आणि ते म्हणाले की, आम्हाला मंडळ वाल्यांना परवानगी नाही दिली आणि स्वतः मस्त पोलीसवाले पोलीस स्टेशनमध्ये DJ लावून डान्स करतात. यांना नियम नाही का, आता यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न गणेश भक्तांनी विचारला आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दोन दिवसांपूर्वी रुजू झाले आहे. ते कारवाई करणार का याकडे गणेश भक्तांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here