जिल्हा परिषदेचे शिक्षक डॉ.शेख तीन वेळेस ‘सेट’ परिक्षा उत्तीर्ण…

नांदेड – महेंद्र गायकवाड

जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूरचे मुख्याध्यापक डॉ.एम.डब्ल्यू.एच. शेख यांनी तिसऱ्यांदा अत्यंत कठीण मानली जाणारी प्राध्यापक पदासाठीची पात्रता परिक्षा ‘सेट’ उत्तीर्ण झाले आहेत.
डॉ.शेख ह्यांनी यापूर्वी शिक्षणशास्त्र विषयात सेट आणि नेट ची परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे.

तसेच “वूमन स्टीज” मध्ये नेट परिक्षा उत्तीर्ण आहेत. परंतू विशेष यावेळेस डॉ.शेख यांनी अत्यंत कठीण परिक्षा व अत्यंत कठीण विषय “जैवतंत्रज्ञान”मध्ये सेट परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अशा प्रकारे तिन भिन्न विषयांत “सेट” परिक्षा करणाऱ्या मोजक्या यशवंतांमध्ये जिल्हा परिषदेच्या डॉ. शेख सरांचा समावेश झालेला आहे.

डॉ. शेख हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणेचे विज्ञान व संरक्षणशास्त्र अभ्यासगटाचे सदस्य असून गत आठ वर्षांपासून त्यांनी बालभारती व अन्य शैक्षणिक क्षेत्रात बहुमूल्य कार्य केले आहे.डॉ.शेख सरांच्या या यशाबद्दल आमदार डॉ.तुषार राठोड, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा) सौ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती,

राजेश कुलकर्णी, श्रीपाद देशपांडे, पदमाकर कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, शिक्षक नेते तसलीम शेख, मधुकर उन्हाळे, दिगांबर मांजरमकर, एम.ए.खदीर, शिवाजी मलदोडे, उदय हंबर्डे, मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, उमाटे सर, लसकाम चे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, डॉ.रफिओद्दिन शेख, एम.ए. खलिक, बाबूराव शिंदे,

मेंदूची शाळेचे इरफान अहमद, प्राचार्य डॉ.बालाजी गिरगांवकर, डॉ. बालाजी लाहोरकर, डॉ. प्रविण पाईकराव, प्रा.डॉ.अशोक गिनगिने आदींनी अभिनंदन केले आहे. डॉ.शेख यांनी आपल्या आई-वडिल, सहकारी मित्रांना यशाचे आधार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here