रामटेक तालुक्यातील जिल्हा परीषद, पंचायत समीति निवडणुक स्वबळावर लढणार; वंचित बहुजन आघाडी चा निर्णय…

रामटेक – राजु कापसे

आगामी निवडणुका संदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पक्ष कार्यालय रामटेक येथे आयोजात्मक बैठक घेण्यात आली.येत्या जिल्हा परिषद,व पंचायत समीति, काही दिवसात घोषीत होनार आहेत.त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने कंबर कसली आहे.या करीता मंगळवार दि.23 मार्च रोजी कार्यालय रामटेक येथे महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली.

अध्यक्ष स्थानी रामटेक विधानसभा अध्यक्ष नरेन्द्र जी काळे,तर प्रमुख मार्गदर्शन रामटेक तालुका अध्यक्ष नम्रसेन डोंगरे,वि.सभा युवा आघाडी अध्यक्ष मनिष खोब्रागडे, वि.सभा उपाध्यक्ष पुरुषोत्तम जी मोहोड, शहर अध्यक्ष संतोष चांदेकर, कोषाध्यक्ष रवी वासनिक, शीतलवाडी अध्यक्ष रजत बोरकर, राहूल काळे , सचिव अनिल मनघटे, यांची उपस्थिति होती.

वंचित बहुजन म्हनजे मानवी प्रतिष्ठेपासुन,उत्पादनांच्या साधनापासुन , मीळणार्रया सवलतीपासुन, व सत्तेपासुन वंचित असनारे या घटकांनी मुख्य प्रवाहापासुन वंचित राहु नये म्हणून,सर्व सामान्य वर्ग, सोबत घेवून सत्तेत आणुन बदल परिवर्तन घडवुन न्याय देण्याचे काम, वंचित बहुजन आघाडी करेल.असे ता.रामटेक अध्यक्ष नम्रसेन डोंगरे यांनी सागीतले.आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर पुर्ण ताकदीने निवडणुक लढवणार असे जाहीर करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here