भुसावळात युवकाची गोळी मारून हत्या !…

भुसावळ – २५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोंडी वाडी, श्रीराम नगर येथे एका ३६ वर्षीय तरुणाची ४ ते ५ संशयीत आरोपींनी चाकूने वार करून पिस्तुलातून गोळी झाडून हत्या केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , शहरातील कोंडी वाडी, बोन्डे कटरजवळ, श्रीराम नगर भागात काल मंगळवार रात्री ११ वाजेच्या सुमारास विलास दिनकर पाटील-चौधरी (वय ३७ वर्ष, रा. कोंडी वाडी, बोन्डे कटर जवळ, श्रीराम नगर, भुसावळ) याला ४ ते ५ संशयीत आरोपींनी चाकुने हल्ला करून पिस्तुलातून गोळी झाडल्याने या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्लेखोर तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.

हा हल्ला करण्यामागे ४ ते ५ हल्लेखोर असण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे . एका तरुणावर गोळीबार झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खाजगी रुग्णालयात चौधरी यास जखमी अवस्थेत हलवले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तरुणावर हल्ला करण्यामागे पूर्व वैमनस्य असल्याची दाट शक्यता आहे.

मात्र पोलीस सर्व दृष्टीने तपास करीत असल्याचे पोलीस उपअधीक्षक राठोड यांनी सांगितले. पसार झालेल्या आरोपींचा शहरात कसून शोध सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोडांसह पोलीस प्रशासनाला गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या घटनांच्या गुन्ह्यांवर पायबंद बसविण्यात यश आले असतांना

काल रात्री ११ वाजेच्या सुमारास थेट चाकू हल्ला करून युवकावर गोळी झाडून त्याचा खून झाल्याने शहरात पुन्हा अशांतता निर्माण झाली आहे. भुसावळातील वाढती गुन्हेगारी पुन्हा चव्हाट्यावर आली असून गुन्हेगारीचा बीमोड करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here