Breaking Yavatmal | वाघाच्या हल्ल्यात युवक ठार! गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी, झरीजामणी तालुक्यातील घटना…

यवतमाळ – सचिन येवले

झरी जामणी तालुक्यातील पाटणबोरी शेजारी असलेल्या पिवरडोल येथील एका १७वर्षीय युवक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गावा शेजारी शौचास गेला असल्याने घरी परत आला नसल्याने घरच्या सदस्यानी गावातील नागरिकांना सोबत घेवून युवक ज्या ठिकाणी शौचास गेला त्याठिकाणी पाहणी केली असता त्याठिकाणी मोबाईल, व टमरेल आढळून आले असल्याने युवकावर वाघाने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे.

१७ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असल्याने. नागरीका मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अविनाश पवन लेनगुरे (१७) रा पिवरडोल ता .झरीजामणी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. वाघ घटनास्थळी एका झुडपात बसलेला असून गावकरी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. वनविभागाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

अविनाश लेनगुरे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारासगावलगत शौचास गेला असता, वाघाने हल्ला करून त्याला गावा शेजारीच असलेल्या एका शेतात फरफटत ओढत नेऊन त्याला ठार केल्यांची घटना आज शनिवारी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी केली असून वाघाने अद्यापही घटनास्थळ सोडले नाही नसल्याने नागरीका मध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here