न्यूज डेस्क – पुण्यातील हत्यांचं सत्र थांबयच नावच घेत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज पुन्हा पुण्यातील कोंढवा भागात दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दहा दिवसातील कोंढवा भागातील हे तिसरे हत्याकांड आहे.
हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विठ्ठल रामदास धांडे वय वर्ष २४ याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सादर हत्या हि पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती असून यात तिघांनी दगडाने मारहाण करत हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
गेल्या दहा दिवसात कोंढवा भागात झालेला हा तिसरा, तर सहा दिवसात पुणे शहरात झालेला हा चौथा खून आहे.पुण्याच्या खराडी भागात कुख्यात गुंडाची दोनच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. मोकळ्या मैदानात दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आलं होतं. गुंड शैलेश घाडगेच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हि दुसरी घटना.