पाहुनगावात कोरोनामुळे युवकाचा मृत्यु; ३ तासानंतर मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात…

लाखांदुर पोलीसांची सर्वोत्तम कामगीरी…

लाखांदुर – नास्तिक लांडगे

एक दिवसापुर्वी खाजगी रुग्णालयात ऊपचार करुन घरी परतलेल्या युवक रुग्णाची पुढील दिवशी प्रकृती खालावल्याने ऊपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . ऊपचारादरम्यान कोविड चाचणी केली असता पॉझीटीव्ह आढळुन येतांनाच सबंधित युवकाचा तडकाफडकी मृत्युही झाला.

यावेळी आरोग्य प्रशासनाने मृतदेह कुटुंबियांना ताब्यात देण्यास मजिजाव केला असतांना देखील कुटुंबियांनी जबरीने मृतदेह घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती लाखांदुर पोलीसांना होताच येथील तहसिलदार व ठाणेदारांनी मृतकाचे घर गाठुन तिन तासानंतर मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात यश आले असुन ही लाखांदुर पोलीसांची सर्वोत्तम कामगीरी ठरल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

सदर घटना लाखांदुर तालुक्यातील पाहुनगाव येथे १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजता दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार, पाहूनगाव येथील एका 23 वर्षीय युवकाची 9 ऑक्टोबर रोजी प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी एका खाजगी डॉक्टर कडून उपचार करुन घेतला होता. सदर उपचार झाल्यानंतर रुग्न त्याचे स्वगावी पाहूनगाव येथे परतला होता. मात्र पुढील दिवशी प्रकृती खालावल्याने त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती चिंताजनक असल्याने प्रारंभी औषधोपचार चालविताना कोविड चाचणी देखील केली. सदर चाचणीत संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. मात्र काही वेळाने त्याचा रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यास मज्जाव केला. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाचा मज्जाव झुगारून जबरीने मृतदेह घरी घेऊन गेले.

सदर घटनेची माहिती लाखांदूर चे ठाणेदार शिवाजी कदम व तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना होताच तात्काळ पोलीस प्रशासनासह मृतकाचे गावी जाऊन मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात देण्यासाठी विनवणी केली.मात्र कुटुंबियांचा विरोध कायम असल्याचे पाहुन यासबंध घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देत पोलिसांची अधिक कुमक बोलाविन्यात आली.यावेळी पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखत तब्बल 3तासानंतर मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात पोलिस प्रशासनाला यश आले.

दरम्यान सदर मृतदेह आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी भंडारा येथे घेवुन गेले.एकुणच या घटनेवरुन तालुक्यातील पाहुनगाव येथे काही काळ पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.मात्र मृतकाच्या कुटुंबियांसह गावक-यांच्या सहकार्याने तब्बल 3 तासानंतर मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात घेतांना लाखांदूर पोलीसांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

ही कामगिरी लाखांदूर चे ठाणेदार शिवाजी कदम व तहसीलदार प्रदिप शेवाळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम,प्रमोद करसुंगे,पोलिस शिपाई राहूल गायधने,मुंडे,नितिण बोरकर,पोलिस नाईक दुर्योधन वकेकार,मनिष चव्हाण,संदीप रोकडे,यासह बहुसंख्य पोलिस कर्मचा-यांनी चोख बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here