अकोट – कुशल भगत
ठाणेदार ज्ञानोबा फड ने काढला डोहातुन मृत्यूदेह बाहेर..
अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील रहिवाशी राम अरूण झापर्डे वय २२ वर्ष हा रविवार असल्याने सकाळी मित्रा त्रासोबत सातपुड्यात फीरण्यासाठी गेला असता पोपटखेड खटकाली रोडवर पार बाबा नजिक नदीपात्रातील डोहात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
दिनांक 20 सप्टेंबर रविवार दुपारी घडली घटनास्थळ हे चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असुन चिखलदरा पोलीसाना घटनास्थळी खुप ऊशीर होत असल्याचे पाहुन घटनास्थळी स्वता अकोट तहसीलदार हरीश गुरव अकोट ग्रामिणचे ठाणेदार ज्ञानोबा फड पोहचले,
परंतु परिस्थिति पाहता अखेर अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वता डोहात ऊडी मारली व एक तास पाण्यात राहुन राम अरूण झापर्डे यांचा मृत्यूदेह बाहेर काढला यावेळी अकोटचे प्रभारी तहसीलदार हरीश गुरव पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे सह नंदु कुलट सह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात आसेगाव येथील नागरीक उपस्थित होते.