मूर्तिजापुर । कार खाली दबून युवकाचा मृत्यू…कुरुम जवळील घटना…

कुरुम – अजय गायकवाड

राष्ट्रीय मार्गावरील कूरूम बस स्टॅन्ड जवळील असलेल्या वृदवान बारसमोर एक पांढऱ्या रंगाच्या कार 30 वर्षीय युवकाच्या अंगावरून नेल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजून 30 दरम्यान घडली सदर घटनेत कारखाली आलेल्या युवकाचा काही वेळाने मृत्यू झाला.

तालुक्यातील ग्राम माटोडा येथील सुमेध तुकाराम गवई वय 30 हा तरुण सायंकाळच्या सुमारास बारमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. त्याने मध्य प्राशन केल्याने त्याला तोल संभाळणे कठीण झाल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. वृंदावन बार च्या गेट समोर एक एक पांढऱ्या रंगाची कार अभी होती.

यावेळी कारच्या मागे युवक पडून होता. यावेळी कार रिव्हस घेताना सुमेदच्या छाति तसेच पायावरुन गेली दगडावर जबर मार लागल्याने सूमेद गंभीर जखमी झाला. सदर घटना घडताच कार चालकाने अकोल्याकडे पोबारा केला.

या घटनेची माहिती कूरूम चौकी च्या पोलिसांना कळतच त्यांनी संशयित वाहनाबाबत मूतिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देत राष्ट्रीय महामार्ग वर नाकेबंदी केली. या नाकेबंदीत कार व चालकाला ताब्यात घेतले असून बातमी लिहिस्तोर या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.या घटनेचा पुढील तपास मा ना पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here