अमरावती शहरात २० वर्षीय युवकाची निर्घृण हत्या !…दोन आरोपी अटकेत

अमरावतीच्या दस्तुरनगरच्या बाजूला असलेल्या जेवड नगरातील एका युवकाची रात्री अंदाजे ८ वाजताच्या च्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अमन खंडारे वय वर्ष 20 असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून अमन हा काही दिवसांपूर्वीच पुण्यावरून घरी आला होता.

तर जेवड नगरातील राहणाऱ्या अभिषेक डोक्याव, मनु उर्फ रितिक सामरे हे दोन्ही अमन चे मित्र होते बर्याच दिवसांनी अमनची भेट झाली असता अमन ला दारू पाजण्यात आली यानंतर जुना वाद उफाळून आला आणि या दोन युवकांनी अमनवर तीक्ष्ण अवजाराने वार करून हत्या करून त्याला नालीत फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here