लपली तुझी सावली…!

लाखांदूर – नास्तिक लांडगे

जन्मत:च तिला वेडसर व मतिमंद आईच्या कुशिची उब लाभली.वेडसर व मतिमंद पणात आईने मिळविलेल्या भिकेतून ती वाढली.मात्र तिचे सर्वायुष्य वेडसर व मतिमंद आईच्या सहवासात न जाता ती शिक्षित होउन सुदृढ व सक्षम व्हावी या उदात्त हेतूने काहींनी पुढाकार घेत तिला निवासी शाळेत दाखल केले.

आता ती 6व्या वर्गात आहे.मात्र अशातच गत 4-5दिवसापूर्वी आईचे दुर्दैवी निधन झाल्याने आई लपली तुझी सावली म्हणत भावी आयुष्यासाठी समाज पुढाकाराची याचना करतांना दिसत आहे.ही व्यथा आहे लाखांदूरातील अंकिता नामक एका 10वर्षीय बालिकेची.

रेखा वसाके नामक वेडसर व मतिमंद आईचे पोटी जन्म घेतांना सहवासाने ती देखील काही अंशी मतिमंद जाणवते.सद्या ती जिल्ह्यातीलच एका निवासी शाळेत वर्ग 6वीत शिकत असली तरी आईच्या मृत्युने ती एकाकी व निराधार झाली आहे.

समाज पुढा काराने तिला शाळा शिकुन वाळवंटात हिरवळ फुलविन्याचा मार्ग मिळाला खरा.मात्र काही अंशी मतिमंद जाणवणा-या अंकिताला सुदृढ व सक्षम जिवनासाठी पुन्हा एकदा समाजातील दातृत्व शक्तीची गरज वाटते.

दरम्यान 25ऑगष्ट रोजी मृत रेखाला श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी न.प.गटनेते रामचंद्र राऊत यांच्या नेतृत्वात भोजन व्यवस्था देखील करण्यात आली.मृत्यू पश्चात सर्वच सोपस्कार पार पाडले गेले तरी एकाकी व निराधार अंकिताला खरी गरज आहे.

ती तिच्या भावी आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी समाज पुढाकाराची व मदतीची.या गरज पुर्तीसाठी समाज पुढाकार घेणार काय?हा यक्ष प्रश्न पडतांना एकाकी अंकिता आई लपली तुझी सावली एवढेच तर पुटपुटत नसावी ना!असेही अनेकांनी बोलून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here