आणि त्या तरुणासाठी देवदूत ठरले नाविद मुश्रीफ आणि रेस्क्यू टीम…

राहुल मेस्त्री

गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर आणि बेळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वच नद्यांना महापूर आल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. व शक्य असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दिनांक 23 रोजी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील दुध गंगा नदीच्या पाण्यात एक युवक वाहून जाऊन काही अंतरावरच विद्युत पेटीवर अडकला होता.

ही माहिती समजताच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव व गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांनी एस.डी.आर.एफ. करनूर व एन.डी.आर.एफ. रेस्क्यू टीम घेऊन दुधगंगा नदीवर पोहचले. व त्या तरुणाला वाचवण्यात या जवानांना यश मिळाले.

यामध्ये जीव रक्षक म्हणून परिचित असलेले व हजारो नागरिकांचे आपात्कालीन वेळेत जीव वाचवलेले दिनकर कांबळे यांनी दुध गंगा नदी मध्ये वाहणाऱ्या पाण्यामध्ये उडी मारून त्या तरुणाजवळ जाऊन त्याला इनरच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आले.

यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले, माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे कि, दूधगंगा नदी जवळील सुळकुड, लिंगनूर दु., मौजे सांगाव, कसबा सांगाव, करनूर, वंदूर व कर्नाटकातील कोगनोळी या सर्व गावातील नागरिकांनी सतर्क रहावे.व स्वतःची काळजी घ्यावी. अतिवृष्टी सदृश पावसाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडावे. सखल व नदीकाठी असलेल्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच सहकार्य करून सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित व्हावे. अवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here