घोडेगाव येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

घोडेगाव – घोडेगाव येथील श्रीधर बालिकराम ढोले यांचा मोठा मुलगा गोपाल श्रीधर ढोले ( वय 30 वर्षे ) याने राहत्या घरात लहान मुलासाठी बांधलेल्या साडीच्या पाळण्याला गळफास घेऊन आपली जीवनायात्रा संपवली.

गोपाल हा तसा प्रत्येक कामात तरबेज होता शेतीचं कुठंलही मिळेल ते काम तो करायचा मनमिळावू स्वभावाचा मितभाषी आपल्या सदैव कामात मग्न राहणारा, संकटाकाळी सर्वांच्या मदतीला धावून येणारा त्याच असं अचानक निघून जाणं गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाला चटका लावून गेले. गोपालच्या पश्चात आई वडील व एक भाऊ व बहीण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here