पालघरच्या सुर्या नदीत पात्रातील बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू…चिल्हार बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील घटना…

पालघर

नदीच्या पाण्यात स्टंट करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. शुक्रवारी ( दि.4)पालघर तालुक्यातील गुंदले गावच्या हद्दीतील सुर्या नदीपात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संजित कनोजिया (वय.17) असे मृत तरुणाचे नाव असून,तो चिल्हार बोईसर रस्त्यावरील मान गावच्या ओस्तवाल वंडर सिटी चा रहिवासी होता.

शुक्रवारी (ता.04) दुपारी आपल्या तीन मित्रांसोबत संजीत कानोजिया चिल्हार बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील सुर्या नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी आला होता. तिघेही नदी पात्रात पोहत असताना बंधार्यावरून उड्या मारत स्टंटबाजी करीत होते.

स्टंट बाजी दरम्यान दोघे जण बंधाऱ्याच्या खालच्या भागात पडल्याने पाण्यात बुडू लागले होते. पाण्याबाहेर असलेल्या त्यांच्या मित्राने आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी एका तरुणाला बुडताना वाचवले परंतु संजीत चा दुर्दैवी मृत्यू झाला.बोईसर एमआयडीसी पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

जुलै महिन्यात सुर्या नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.दरम्यान सुर्या नदी पात्र बंधाऱ्याच्या भागात धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे सुर्या नदी पात्रात पोहण्यासाठी येणाऱ्यांना मनाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here