सावधान…लसीकरण झालेले असेल तरच मिळेल ‘प्रवेश’..! औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश…

औरंगाबाद – ऋषिकेश सोनवणे

देशात एकीकडे १०० कोटी लसीकरण झाल्याचा जल्लोष साजरा होत आहे. तर दुसरीकडे अजूनही बहुतांश जिल्हे लसीकरणात मागे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. पार्श्वभूमीवर लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही. तसेच ‘नो व्हॅक्सिन नो रेशन’, हॉटेल, महाविद्यालय, खाजगी क्लासेस या सर्व ठिकाणी लसीचा पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले आहेत.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी जिल्हा स्तरावर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात लसीकरणाला अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे. लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश असेल. सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच सरकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांना देखील लस घेतलेली असेल तरच कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.

हे आहेत महत्त्वपूर्ण निर्णय

जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये व खाजगी कार्यालयात कार्यरत कर्मचारी लसीचे दोन डोस घेतले आहेत कि नाही याची खातरजमा वरिष्ठांनी करावी.
ज्या गावात/वॉर्डात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका यांनी विशेष मोहिम राबवावी.

हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली असेल तरच दुकाने उघडण्यास परवानगी असेल.सर्व शैक्षणिक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक विद्यार्थी कर्मचाऱ्यांचे लसीकरण अत्यावश्यक आहे. अन्यथा या संस्था सील केल्या जातील. धार्मिक स्थळे लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here