लखिमपूर प्रकरणात योगी आदित्यनाथ यांनीही सह आरोपी करावं – जयदीप कवाडे…

सांगली – ज्योती मोरे

केंद्र सरकार मधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलांना लखीमपुर इथं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये गाडी घालून निष्पाप शेतकऱ्यांचा जीव घेतला.या घटनेला एक आठवडा उलटूनही त्याच्यावर मोदी आणि योगी सरकारनं कोणतीही कारवाई केली नसल्यानं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, त्यांचा मुलगा याच्यासह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आरोपी करुन, त्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जयदीप कवाडे यांनी केलीय.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं सत्तेत वाटा दिला नसल्यानं, आगामी महापालिका निवडणूक पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वबळावर लढवणार असल्याचा इशाराही, कवाडे यांनी यावेळी दिलाय. मिरजेतील जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here