तब्बल बारा वर्षांनी झाला परिसर प्रकाशमय…स्थानिक नागरिकांनी केला नागरी सत्कार…

राहुल मेस्त्री

वसगडे ता.करवीर येथील आम्रपाली बुद्ध विहार परिसरात सर्व जाती धर्माच्या नागरिक वास्तव्य आहेत. गेली बारा-तेरा वर्षे अंधारातच या नागरिकांना जीवन घालवावे लागत असुन. विद्युत पुरवठा पासून वंचित राहावे लागत होते.

याठिकाणच्या बांधवांचे मुले अंधारातच दिव्याच्या उजेडात अभ्यास करत होते. दिव्यांचा उजेड मंद असल्याने अभ्यास करत असताना अडचणी निर्माण होत होत्या. या वसाहती जवळच आम्रपाली बुद्ध विहार असून त्यात बौद्ध धम्माचे प्रचारक आणि प्रसारक, धम्मगुरू पूज्य भदंत आर्. आनंदजी, पूज्य भदंत एस्.संबोधीजी, पूज्य भदंत राहूलजी यांचे वास्तव्य आहे.

एके दिवशी पूज्य भदंत आर् आनंदजी आणि पूज्य भदंत एस् संबोधीजी यांना राजेंद्र ढाले यांनी हंचीनाळ ता.निपाणी येथील एका मंगल परीणयाच्या विधीसाठी आमंत्रित केले होते..यावेळी आम्रपाली बुद्ध विहार व त्याठिकाणी असलेल्या वसाहतीमध्ये आजवर विद्युत पुरवठा नाही.

त्यासाठी आपण प्रयत्न करावे असे सांगण्यात आले होते. असे बोलताच काही दिवसांतच आर पी आय कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात झाली. आणि काही कालावधीतच अनेकांना नाही जमलं ते आरपीआय अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले आर पी आय कोल्हापूर जिल्हा संघटक आयु. राजेंद्र ढाले यांनी ओसाड त्या माळात अंधेरी काळोख्यात प्रकाशमय उजेड पाडला.

गेली बारा तेरा वर्षे ज्या माळा मध्ये, ज्या वसाहतीमध्ये अंधार होता तो अंधार राजेंद्र ढाले यांच्या प्रयत्नाने नाहीसा झाला… हा अंधार उजेडात आणल्यामुळे येथील आम्रपाली बुद्ध विहारच्या नजीक राहत असलेली वसाहतीमधील नागरिकांनी राजेंद्र ढाले यांचा नागरी सत्कार केला.

हा सत्कार पूज्य भदंत आर आनंदजी व पूज्य भदंत एस संबोधीजी, पूज्य भदंत राहूलजी यांच्या उपस्थितीत आर पी आय कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

तसेच या सत्काराला आर पी आय चे युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे, के पंडित, जीवन कांबळे, राजू ग्राफण, स्वप्निल कांबळे, भूपाल कांबळे, नामदेव कांबळे, प्रदीप कांबळे, नितीन कांबळे यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here