यवतमाळ | पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू…संतप्त नातेवाईकांचा आरोप…

दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक

प्रतिनिधी सचिन, येवले । यवतमाळ

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी दारव्हा पोलीस ठाण्यात धाव घेत दगडफेक केली. ही खळबळजनक घटना मंगळवार, दि. ६ जुलैला रात्रीच्या सुमारास दारव्हा शहरात घडली. शेख इरफान शेख शब्बीर वय २७ वर्ष तरोडा असे मृत युवकाचे नावं आहे.

या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा तालुक्यातील तरोडा येथील दोन ते तीन तरुणांना पोलिसांनी दारव्हा शहरातून काही कारणास्तव ताब्यात घेतले होते. त्यातील एकाची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शेख इरफान शेख शब्बीर असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मृत युवक शेख इरफान शेख शब्बीर याच्या नातेवाईकांना मिळाली, त्यावरून संतप्त नातेवाईकांनी थेट दारव्हा पोलीस स्टेशन गाठून दगडफेक केली. या दगडफेकमध्ये शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलिसांनी दारव्हा पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून वृत्त लिहिपर्यत दारव्हा पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here