Wednesday, May 31, 2023
HomeBreaking Newsयवतमाळ | पुरवठा विभागाची महिला अधिकारी अमरावती ACB जाळ्यात...१० हजाराची लाच घेतांना...

यवतमाळ | पुरवठा विभागाची महिला अधिकारी अमरावती ACB जाळ्यात…१० हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले…

यवतमाळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या महिला निरीक्षण अधिकाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना अमरावती लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले श्रीमती चांदणी शेषराव शिवरकर वय-32 वर्षे. असे लाच घेणाऱ्या महिला अधिकार्याचे नाव असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन अवधूतवाडी, यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यातील तक्रारदार यांचे वडीलाचे नावे असलेले रास्त भाव धान्य दुकान चे प्राधिकार पत्रावर वारस म्हणून तक्रारदार यांचे नावाची नोंद घेण्याचे प्रकरणामध्ये तहसील कार्यालय यवतमाळ येथे लवकर अहवाल सादर करण्याकरीता पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी यांनी तडजोडी अंति 20,000 /- रू ची मागणी केली असता त्यापैकी 10000/- रुपये तक्रारदार यांनी नाईलाजास्तव यापूर्वीच दिले आहे उर्वरित 10,000/- रू.लाचेची मागणी करीत असल्याबाबत सविस्तर तक्रार दिली होती.

सदर तक्रारीवरून दिनांक 24/05/ 2023 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान यातील लोकसेवक श्रीमती चांदणी शिवरकर निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय यवतमाळ यांनी तक्रारदार यांचे वडीलाचे नावे असलेले रास्त भाव धान्य दुकान चे प्राधिकार पत्रावर वारस म्हणून तक्रारदार यांचे नावाची नोंद घेण्याचा अहवाल तहसील कार्यालय येथे पाठविले बाबतचा मोबदला म्हणून 10,000/- रू. लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले व लगेच आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान यातील आलोसे श्रीमती चांदणी शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडून 10,000/-रुपये लाचेची रक्कम त्यांचे कक्षामध्ये स्वीकारल्याने आलोसे यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन अवधूतवाडी, यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मार्गदर्शन –
मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

1)श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

2)श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

3) श्री संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,

4) श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,

सापळा व तपास अधिकारी, पो. नि.अमोल कडू, ला.प्र.वी.अम.

कारवाई पथक
अमोल कडू,पोलिस निरीक्षक, योगेशकुमार दंदे, पोलीस निरीक्षक,
पोना- विनोद कुंजाम,
मपोकॉ-चित्रलेखा वानखडे
पोकॉ – शैलेश कडू ,
चालक पोहेका. गोवर्धन नाईक ला.प्र.वी.अमरावती.

सक्षम अधिकारी
मा.विभागीय आयुक्त,अमरावती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: