यवतमाळ | वाघाच्या हल्ल्यात महिला ठार…पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी गावातील घटना…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ : शेतात निंदन करीत असताना अचानक वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातीलअंधारवाडी गावालगत असललेल्या शेतात  घडली. लक्ष्मी दडांजे (55) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पांढरकवडा वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या पाटणबोरी बिटमधील अंधारवाडी आणि लगतच्या गावात वाघाची दहशत निर्माण झाली होती.  

आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास मृतक लक्ष्मीबाई दडांजे ही महिला आपल्या शेतामध्ये निंदन करीत होती. अचानक वाघाने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला. तिने आरडाओरडा केल्याने शेतातील मजूर तिच्या मदतीसाठी धावून आले.

मात्र तोपर्यंत तीचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोंकने व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळा कडे धाव घेतली. मृतदेह पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले. यावेळी प्रभारी उप वनसंरक्षक सुभाष धुमारे याच्यासह वनविभागाचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. 

पांढरकवडा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या पाटणबोरी सर्कल मधील बोरी बीटमध्ये असलेल्या अंधारवाडी या परिसरात मागील काही दिवसापासून वाघाचा वावर सुरू आहे. आतापर्यंत या परिसरातील पाळीव गाय, बैल, बकरी अश्या आठ ते दहा जनावरांची शिकार केली आहे.  

7 ऑगस्ट रोजी अंधारवाडी व परिसरातील गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहने गावकऱ्यांनी अडविले होती. तर 15 दिवसांपूर्वी वाघाने एका शेतकऱ्यांवर हल्ला चढविला होता.

मात्र, त्याने जीव वाचविण्यासाठी झाडावर चढल्याने त्याचा जीव वाचला असल्याची घटना ताजीच आहे. याची दखल घेऊन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी 20 जणांची रेस्क्यू टीम तयार करण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षांपूर्वी अवनी टी

वाघ शेत शिवारात दिसल्याने गावकरयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टीपेश्वर अभयारण्यजवळ हे गाव असल्याने या अभयारण्यातून वाघ या भागात शेत शिवारात आला असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here