यवतमाळ | आतापर्यंत १७ मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द…जिल्हाधिका-यांची कडक कारवाई…

सचिन येवले,यवतमाळ

यवतमाळ, दि. 27 : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करणा-या 17 दुकानांचे परवाने आतापर्यंत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहे. यात आठ बार ॲन्ड रेस्टॉरंट, पाच देशी दारुची दुकाने, दोन वाईन शॉप, एक बिअर शॉपी आणि विदेशी दारुचे होलसेल असलेल्या एका गोदामाचा यात समावेश आहे.


लॉकडाऊनच्या दरम्यान तक्रारी आलेल्या दुकानांची तपासणी केली असता मद्यसाठ्यामध्ये तफावत, बनावट दारुची निर्मिती आदी कारणावरून जिल्हाधिका-यांनी मंगळवारी दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले. यात आर्णी तालुक्यातील जवळा येथील हॉटेल अमित रेस्टॉरंट ॲन्ड बार आणि यवतमाळ येथील हॉटेल सिम रेस्टॉरंट ॲन्ड बारचा समावेश आहे.

Also Read: मिश्यासह शाहरुख खानचा जुना फोटो..


तसेच मद्यसाठ्यामध्ये तफावत आढळून आल्याने मद्यविक्री करणा-या यवतमाळ येथील इन्फीनीटी स्पोर्ट क्लब, दारव्हा रोडवरील हॉटेल नंदीनी रेस्टॉरंट ॲन्ड बार, हॉटेल झेलेलाल प्राईड, हॉटेल चेतना वाईन बार, हॉटेल एस. कुमार वाईन बार आणि हॉटेल एकविरा वाईन बार या दुकानांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे तीन लाख रुपये दंड तर लोहारा येथील ओम बिअर शॉपी या दुकानाला 25 हजार रुपये दंड असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here