यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त जखमींना केली मदत

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ : वणी, पांढरकवडा, मारेगाव, रालेगाव येथील कोविड केअर सेंटर ची पाहणी करून यवतमाळ येथे परत येत असतांना पांढरकवडा ते यवतमाळ रस्त्यामध्ये एका रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्या ठिकाणी एका रिक्षामध्ये दहा ते 12 व्यक्ती होते.

त्यातील अनेक जखमी होते आणि त्यांना कोणी मदत देत नव्हते तसेच त्यांच्यासाठी कोणी थांबत नसताना पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी आपला ताफा त्या ठिकाणी थांबवला व जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले.

याप्रसंगी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हेही त्यांच्यासोबत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here