यवतमाळ | डॉ हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येचा खुलासा…जाणून घ्या प्रकरण…

सचिन येवले, यवतमाळ – 4 मे 2019 मध्ये रात्री उशिरा उमरखेड च्या शिवाजी चौकात मोटर सायकल अपघात झाला होता. त्यात मृतक नामे शेख अरबाज शेख अब्रार हा गँभिर जखमी होता त्याला उपचारासाठी उमरखेड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्याचा मृत्यू झाला. शेख अब्रार याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

मृतकाचा भाऊ एफाज अब्रार शेख याने डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यावरून पोलिसांनी तांत्रिक बाबीचे बारकाईने विश्लेषण केले असता या तेव्हाच्या घटनेतील cctv फुटेज आणि आता च्या घटनेतील cctv फुटेज मधील आरोपी सारखा दिसत असल्याचे पुढे आलेत्यात गोपनीय माहिती आधारे आरोपी नामे एफाज उर्फ अप्पू शेख अब्रार याने व त्याचा मामा सय्यद तौसिफ सय्यद खलील व इतर मित्राच्या मदतीने डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करून पसार झाला

यात 1)सय्यद तौसिफ सय्यद खलील
2)सय्यद मुस्ताक सय्यद खलील
3)शेख मोहसीन शेख कयुम
4) शेख शाहरुख शेख आलम सर्व राहणार ढानकी यांना अटक केली असून मुख्य आरोपी एफाज उर्फ अप्पू शेख अब्रार हा फरार असून त्याच्या शोधण्यासाठी 10 पथके कार्यान्वित केली आहे. गुन्ह्याचा 48 तासात उलगडा केला म्हणून पोलीस पथकाला 1 लाख रुपये चे प्रोत्साहनपर बक्षिस पोलीस अधीक्षक डॉ भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here