यवतमाळ | जुगार अड्ड्यावर धाड…१३ जण अटकेत…वणी पोलिसांची कारवाई…

यवतमाळ : गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील विद्यानगरी येथील आर आर ढाबा या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकुन 13 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वणी पोलिसांनी केली.


पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  विद्यानगरी येथील आर आर ढाबा येथे काही इसम जुगार खेळत आहे. डीबी प्रमुख गोपाल जाधव यांनी आपल्या सहका-यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. धाब्याच्या मागच्या टिनाच्या शेडमध्ये काही इसम पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले.

त्यांनी लगचे त्या ठिकाणी धाड टाकून 13 जुवा-यांना अटक केली. विद्या नगरीतील आर आर ढाबा येथे नेहमीच जुगार भरत असल्याची चर्चा सुरू आहे. या ठिकाणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक खेळण्यासाठी येत असून 5 ते 10 लाखांवर जुगार भरत होता. मात्र, पोलिसांना आज कशी माहिती मिळाली आणि करवाई केली याचे कुतूहल नागरिकांना पडले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन विनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, दीपक वाड्रसवार, पंकज उंबरकर यांनी केली.

महाव्हाईससाठी सचिन येवले ,यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here