यवतमाळ | पुसद शहर पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधकाचे जाळ्यात…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ /पुसद शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले प्रशांत स्थूल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या जाळ्यात घेतले आहे.
आरोपी लोकसेवक प्रशांत विजयराव स्थूल वय ३५ वर्षे पोलीस नाईक बक्कल नंबर ४२ नेमणूक पोलिस स्टेशन पुसद शहर रा. श्रीरामपूर पुसद जिल्हा यवतमाळ यांनी दि.१२ सप्टेंबर २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी कार्यवाही दरम्यान तहसील कार्यालय पुसद समोरील चहाच्या कॅन्टीन वर तक्रारदार यांना जुगाराच्या केसमध्ये आरोपी न करण्याकरता लाच मागितली होती.त्या अनुसंगाने तडजोडी दरम्यान १ हजार ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते.

कार्यवाही दरम्यान लोकसेवक यांना तक्रारदार यांचेवर संशय आल्याने आलोसे यांनी तक्रारदार यांना भेटण्याचे टाळीत होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि तक्रारदार यांना संबंधित प्रकरणाची माहिती असताना ती आलोसे यांना कारवाई करण्याच्या पहिले कळाली कशी? त्यामुळे त्यांनी लाच स्वीकारण्यासाठी तक्रारदार यांना भेटण्याचे टाळले.या वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मध्येच कोणीतरी घरभेदी असावा? असा संशय व्यक्त केला जात आहे.

लाचलुचपत विभागाने दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी लोकसेवक प्रशांत विजयराव स्थूल वय ३५ वर्षे पोलीस नाईक बक्कल नंबर ४२ नेमणूक पोलिस स्टेशन पुसद शहर जिल्हा यवतमाळ यांना पोलिस स्टेशन पुसद शहर येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती, अप्पर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे,पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे,पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, इतर कर्मचारी ज्ञानेश्वर शेंडे, अनिल राजकुमार, महेश वाकोडे, वसीम शेख, राकेश सावसाकडे, राहुल गेडाम यांनी कार्यवाही दरम्यान कार्य केले. शासकीय लोक सेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here