यवतमाळ | गुन्हेगारी वर्तुळातील कुख्यात गुंडाची भरदिवसा हत्या !…

लोहारा परिसरात खुनाचे सत्र सुरूच भरदिवसा घडत आहेत खुनासारख्या घटना यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला का ? नागरिकांचा सवाल.

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ – लोहारा परिसरात गेल्या काही वर्षांपासून दोन गटात टोळीयुद्ध सुरू आहे अशातच आज दुपारी अंदाजे दीड वाजता दरम्यान गुन्हेगारी वर्तुळातील कुख्यात गुंड देविदास निरंजन चव्हाण यांची सपासप वार करून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे

मृतक देविदास चव्हाण हा नुकताच महिन्याभरापूर्वी कारागृहाबाहेर आला होता त्याच्यावर भैय्या यादव नामक युवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता अशातच आज सकाळी देविदास चव्हाण हा दुचाकीने लोहारा परिसरातून जात असताना आधीच देविदास च्या मार्गावर असलेले मारेकरी यांनी मारुती शोरूम समोर देविदास चव्हाण याला अडवून त्याच्या गळ्यावर छातीवर सपासप वार करून त्याचा जागेवरच खून करण्यात आला

विशेष म्हणजे भैया यादव ह्याच्यावर ज्या जागेवर प्राणघातक हल्ला केला होता त्याच जागेवर देविदास चव्हाण यांचा आज भरदिवसा खून करण्यात आला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर या घटनास्थळी दाखल झाल्या खून करून आरोपी पसार झाली आहे मात्र पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here