यवतमाळ | राज्य सरकारच्या आदेशाचा आय एम ए कडून पदव्या जाळून निषेध…

यवतमाळ – सचिन येवले

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे , दिनाांक ३१/८/२०२० च्या ( क्र. corona/2020/CR97/arogya 5), या पररपत्रकातील सूचनाांनुसार रुग्णालये चालणे, व रूग्ण सेवा देणे अशक्य असल्याने, इंडियन मेडिकल असोशीएशन, महाराष्ट्र राज्याच्या दि. ४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये सदर परीपत्रक पूर्णपणे फेटाळण्यचा ठराव एकमताने मंजूर झाला.

कॉविड महामारी सुरु झाल्या पासून महाराष्ट्र सरकार ने आणि आरोग्य सचिवा पासून सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आयएमए आणि सर्व खासगी डॉक्टरांवर सतत अन्याय चालविला आहे. डॉक्टरांना सतत एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात येत आहे कोविड हॉस्पिटल चे दर दडपशाही पद्धतीने डॉक्टरांना विश्वासात ना घेता एकतर्फी ठरवले जात आहेत.

डॉक्टर्स रुग्णांची लूट करत असल्याचा अपप्रचार नेते व मंत्री करत आहेत, खाजगी डाक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना दिला जाणारा ५० लक्ष रुपयांचा विमा सवरक्षण हि केवळ फोल घोषणा ठरली, प्रत्यक्षात तो क्लेम खाजगी डॉक्टरांसाठी नाही अस विमा कंपनीचं म्हणणे आहे, या सर्व प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच राज्य सरकारच्या आदेशाचा निषेध करीत आयएमए संघटनेने राज्यभर आंदोलनास प्रारंभ केला आहे.

या पार्श्वभूमीवर आय एम ए च्या यवतमाळ शाखेच्या डॉक्टरांनी कोविड उपचारात मृत्युमुखी पडलेल्या तब्बल १५० शाहिद डॉक्टरांना ९ सप्टेंबर रोजी मुक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे . तसेच रात्री आयएमए हॉल समोर शाहिदच्या स्मरणार्थ दिवे लावून अभिवादन करण्यात आले.

या आंदोलनाचा एक भाग म्हणून १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील आयएमएच्या सर्व शाखांसमोर तसेच मुख्य चौकात डॉक्टरांनी एकत्र येऊन मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली. यवतमाळ येथे सुद्धा आय एम ए च्या कार्यालयात आपल्या पदव्याची जाळून आपला निषेध नोंदविला,

ह्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्य पूर्वक विचार न केल्यास, ज्या प्रमाणे राजकीय नेत्यांनी स्वतः ला क्वारंटाईन करून घेतलंय, तसंच सर्व आय एम ए सभासद राज्य पातळीवर स्वतः ला १५ दिवस क्वारंटाईन करून घेईल. या संदर्भात आयएमए संघटना उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आयएमएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

डॉ टी सी राठोड, माजी अध्यक्ष आय एम ए, महाराष्ट्र राज्य
डॉ संजीव जोशी, अध्यक्ष आय एम ए, यवतमाळ
डॉ प्रशांत कसारे पाटील, आय एम ए, यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here