सचिन येवले ,यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात सध्या डॉक्टर आणि जिल्हाधिकारी यांच्यात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूक वरून वाद निर्माण झाला असून काल पासून यवतमाळ शहरातील आझाद मैदान या ठिकाणी डॉक्टर संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आज या धरणे आंदोलनाला आज मेग्मो संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ राजेश गायकवाड यानी भेट दिली शिवाय IMA राज्य संघटनेने सुद्धा आज या आंदोलनाला पाठिंबा दिला या सर्व प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी एक पाउल पुढे येत सामंजस्य भूमिका घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मेग्मो संघटनेने दिला.
आज दिवसभरातील घडामोडी मध्ये जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात जिल्हाधिकारी यांच्या समर्थनासाठी काही नागरिकांनी फलक बाजीं करून जिल्हाधिकारी यांना समर्थन दिले सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी डॉक्टर संघटनेशी चर्चा केली आंदोलन मागे घेण्याबाबत सांगितले मात्र जोवर जिल्हाधिकारी यांची बदली होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका डॉक्टर संघटनांनी घेतली आहे,