Breaking | यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह २३३ जण पॉझेटिव्ह १५६ जण कोरोनामुक्त…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 156 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये पांढरकवडा तालुक्यातील 68 वर्षीय आणि दिग्रस येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 233 जणांमध्ये 139 पुरुष आणि 94 महिला आहेत.

यात यवतमाळातील 90 रुग्ण, पुसद येथील 8, दिग्रस 36, पांढरकवडा 19, वणी 16, दारव्हा 13, बाभूलगांव 21, घाटंजी 3, कळंब 8, महागाव 4, उमरखेड़ येथील 5, नेर 5, मारेगाव 2 आणि 3 इतर रुग्ण आहेत. शनिवारी एकूण 1681 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 233 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1448 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1502 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17330 झाली आहे. 24 तासात 156 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15369 आहे. तर जिल्ह्यात एकूण 459 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 161571 नमुने पाठविले असून यापैकी 160005 प्राप्त तर 1566 अप्राप्त आहेत. तसेच 142675 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here