यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह…मग सुरु झाली प्रशासनाची धावपळ…

सचिन येवले यवतमाळ

यवतमाळ शहरातील तायडे नगर परिसरातील एक ४२ वर्षीय नागरिक आरोग्याच्या समस्या वरून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाला होता. मात्र ४ दिवसाने  त्याची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

परंतु त्याचा कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्याने आता चांगलीच खळबळ उडाली मात्र रात्री उशिरा पुन्हा या रुग्णाला ताब्यात घेण्यात आले असून आता त्याच्यावर पुन्हा उपचार सुरु केला.  

तायडे नगर  मधील रहिवासी असलेला एका ४२ वर्षीय इसमाला अस्थमाचा त्रास होत असल्याने तो २० जुलै ला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला . त्या दरम्यान त्याचा स्वाब घेण्यात आला . त्याचा पहिला कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला .

त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले . तो बारा झाल्यामुळे त्याला २४ जुलै रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात अली . मात्र २५ जुलै राजी त्याचा दुसरा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . त्या मुळे चांगलीच खळबळ उडाली .   

आता या प्रकरणात  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हा रुग्ण विना परवानगीने घरी गेला होता . त्याला संदर्भित करण्यात यावे आणि पुढील उपचार करण्यात यावे असे पत्र  तालुका आरोग्य अधिकाऱ्यास दिले असून त्याचा अहवाल सादर करण्याचा सूचना केल्या . . एकंदरीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चुकी 

वर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला  जात असून डॉ ना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे . आणि संपूर्ण प्रकरण  संबंधित रुग्णास च्या अंगावर टोलविण्याचा   प्रयत्न सुरु आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here