यवतमाळ जिल्ह्यातील १६ रेतीघाटांचा २२ कोटींमध्ये लिलाव ८९९५२ ब्रास रेतीसाठा मंजूर…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यातील 16 रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला असून यासाठी सर्वोच्च बोली एकूण 22 कोटी 82 लाख 57 हजार 064 रुपये लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन 2019 – 20 मध्ये या सर्व रेतीघाटासाठी निश्चित केलेली सरकारी रक्कम 14 कोटी 3 लाख 93 हजार रुपये होती. निश्चित केलेल्या दरापेक्षा 8 कोटी 78 लाख रुपये या माध्यमातून शासनाकडे अतिरिक्त जमा होणार आहे.

बाभुळगाव तालुक्यातील भैयापूर रेतीघाटाची सर्वोच्च बोली 87 लाख 68 हजार 500 रुपये, नागरगाव रेतीघाट 53 लाख 53 हजार 500 रुपये, आर्णि तालुक्यातील साकूर – 1 रेतीघाटासाठी 1 कोटी 25 लाख 95 हजार 555 रुपये, साकूर – 2 रेतीघाटासाठी 1 कोटी 11 लाख 87 हजार 972 रुपये, राणीधानोरा – 2 रेतीघाटासाठी 3 कोटी 1 लाख 83 हजार रुपये, राळेगाव तालुक्यातील जागजाई रेतीघाट 2 कोटी 25 लाख रुपये,

रोहिणी – 2 रेतीघाटासाठी 2 कोटी 87 हजार 14 लाख 141 रुपये, घाटंजी तालुक्यातील विलायता रेतीघाट 89 लाख 5 हजार रुपये, माणूसधारी रेतीघाटासाठी 2 कोटी 3 लाख 5 हजार 555 रुपये, वणी तालुक्यातील सुर्जापूर रेतीघाट 29 लाख 50 हजार रुपये, भुरकी – 1 रेतीघाटासाठी 1 कोटी 99 लाख 96 हजार 786 रुपये, उमरखेड तालुक्यातील साखरा रेतीघाट 90 लाख 500 रुपये,

चालगणी रेतीघाट 1 कोटी 71 लाख 95 हजार 555 रुपये, कळंब तालुक्यातील औरंगपूर रेतीघाट 55 लाख 68 हजार 500 रुपये, मारेगाव तालुक्यातील आपटी उत्तर रेतीघाट 1 कोटी 39 लाख 32 हजार 500 रुपये आणि महागाव तालुक्यातील थार खुर्द रेतीघाटासाठी सर्वोच्च बोली 1 कोटी 11 लाख रुपये लावण्यात आली आहे.

विशेष म्हणजे लिलाव झालेल्या रेतीघाटावर सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच रेतीची उचल करता येईल. सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही वाहन किंवा कामगारांनी रेतीघाटावर प्रवेश केल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here